चिमणगाणी
रंग खेळू या
रंग उधळू या रे, रंग खेळू या ,
खेळता खेळता रंगात आपण दंग होऊ या / / धृ. //
अभ्यासाची रडगाणी आता नको रे ,
रंगपंचमी आज रंग टाकू रे!
अंग भिजवू या रे, चिंब होऊ या // १ //
सोडूनी सारे वादविवाद,
रंगांची रंगावर करू या मात
रंग लावू या रे दंग होऊ या // २ //
रंग नाही, संग नाही होणार कसे ?
रंग जीवनात हे भरणार कसे?
रंग बनवू या रे, रंग बनू या // ३ //
