रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५
मित्रा
मित्रा,
मित्रा,
जे ढळतात
ते निश्चय कसले?
जे गढुळतात
ते संकल्प कसले?
अाता -
तू एक कर
दुनिया ढळली तरी
तू ढळू नकोस !
अन् -
हे भ्याडपणाचे
अश्रू पुन्हा ढाळू नकोस !!
वाटभूल
वाटभूल
वाटा तशा पुष्कळ
एकमेकांत गुंतलेल्या...
एक वाट फारच छान
सरकन ती वाट निघून गेली
वाटांच्याच गुंत्यात..!
तेव्हापासून शोधतोय तिला
अन् ठेचाळत चाललोय
वाट भूल होऊन..!!
वाटा तशा पुष्कळ
एकमेकांत गुंतलेल्या...
एक वाट फारच छान
सरकन ती वाट निघून गेली
वाटांच्याच गुंत्यात..!
तेव्हापासून शोधतोय तिला
अन् ठेचाळत चाललोय
वाट भूल होऊन..!!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)