लेबल

गुरुवार, २३ मे, २०१९

चिमणगाणी (बालगीतसंग्रह)

चिमणगाणी
            बालकविता /गीतसंग्रह


           प्र.श्री.जाधव


अर्पण पत्रिका

माझी मुलं-
कु. छाया उर्फ चिमी व प्रणव ह्यांना.......













अनुक्रमणिका
1. अभिमानाने गाऊ आपण    
2. मिळून जाऊ आपण सारे
3. अंगत पंगत बसू या
4. एक वाट, एक चाल जाऊ चालूनी
5. वीरांचे मैदान
6. खेळू यारे, खेळ सारे
7. काही चाहुळले पानी
8. सारेजण म्हणू सारेजण षिकू
9. षिकू एबीसीडी अन् बाराखडी
10. बस आली बस आली
11. चला झाडून काढू फरफर
12. निसर्गाचे गाणे गाऊ
13. चला चला पोहायला जाऊ सगळे
14. देषाहूनी देषात या रे
15. चिमणबोली आमची बोली
16. वडाची सावली
17. वेगळीच काहूर
18. घंटा
19. खेळू या, नाचू या,
20. भिजण्याची हौस
21. डिचांडिची करू!
22. चला मित्रांनो पारावरं
23. आला आला गणपती आला
24. आटयापाटया खेळू गोटया
25. रंग खेळू या
26. चिवचिव करू, चिवचिव गाऊ
27. झिम्मा खेळू झिम्मा
28. फुगडी बाई फुगडी




1 अभिमानाने गाऊ आपण     

अभिमानाने गाऊ आपण
जय विज्ञान! जय विज्ञान!! ।। धृ।।

विमान फिरवू आकाषी
दोस्ती करू चंद्राषी
सूर्य तारे फिरवुनी आणी
आमुचे अवकाषयान     ।। 1।।                                          

पाताळाची गंगा आपण
खोदून आणू दाराषी
हिमालयास हो घालूनी बांध
वाळवंटही करू नंदनवन ।। 2।।

अणूरेणूचे ज्ञान जाणूनी
कोडे सोडवू विष्वाचे
मने जुळवूनी मनामनाषी
होऊ सारे एकसमान   ।। 3।।









2 मिळून जाऊ आपण सारे

मिळून राहू मिळून खाऊ
मिळून जाऊ आपण सारे ।। धृ।।

घर आपले वेगवेगळे
गाव आपले एकच,
वाटा आपल्या वेगवेगळया
मुक्काम परी एकच!
एक चालीने चालून सारे
गाठू नवे क्षितीज रे   ।। 1।।

एक आपला देश आणि
एक आपला गणवेष,
एकात्मता जोपासुनी
ऐक्य साधू या विषेश !
समतेचे हे मंत्र जपूनी
एकतेचे देऊ नारे    ।।ं 2।।

वेगवेगळया आपल्या भाषा
वेगवेगळया चालीरीती
वेगवेगळे जातीधर्म
संस्कृतीपरी एकच!
विविधतेत या ऐक्य ठेवूनी
ऐक्य साधू या विषेष रे ।। 3।।



3 अंगत पंगत बसू या

अंगत पंगत बसू या
खमंग खिचडी खाऊ या ।। धृ।।

दुपारचे मधले भोजन
किती किती मजेचे
गप्पा गोष्टी करत खाऊ
गंमत जंमत संगतीने
        एकमेकाला देऊ घेऊ
        एकमेकाचे खाऊ या ।। 1।।
षाळेतला भोजन मेनू
एक वेगळा रोज आहे
मित्रांसवे मिळून खाता
किती वेगळी मौज आहे
        षाळेमधली मस्ती आपली
        दोस्तीसह ती टिकवू या ।। 2।।
वेग वेगळया गुरूंजीचे
वेगवेगळेच भारी किस्से
रंगून दंगून ऐकू बोलून
विनोदाने पिकवू हस्से
        नक्कल करत षक्कल दावत
        चाखत माखत खाऊ या ।। 3।।





4 एक वाट, एक चाल जाऊ चालूनी

एक गीत, एक ताल गाऊ मिळूनी
एक वाट, एक चाल जाऊ चालूनी ।। धृ।।

या रे सारे, या रे सारे उठा चला!
अंधार हा निबीड तरी मार्ग काढू आपुला
दिव्य प्रभा, दिव्य तेज काढू षोधूनी ।। 1।।

थांबवा रे रडगाणे कोण ऐकतो?
आपल्याच आत आत जो तो रडतो !
झुंजे तोचि रे वीर खरा मरण झेलूनी !।। 2।।

कास धरूनी विज्ञानाची, अज्ञान टाकू या
षोध घेउनी नित्य नवे, ते ज्ञान मिळवू या
प्रतिभेची अनंत षिखरे टाकू ओलांडूनी ।। 3।।












5 वीरांचे मैदान

वीरांचे मैदान असे हे मर्दांचे मैदान ।। धृ।।

षिकस्त करू या प्रयत्नांची
षक्तीची अन् युक्तीची,
विजयश्री ती खेचूनी आणू
गाऊ विजयगाण...!  ।। 1।।

षर्थ करू या बला-बलाची
बुद्धीची नि चापल्याची,
द्दढ ठेवूनी निष्चय मनी
होऊ हिम्मतवान...!  ।। 2।।

तमा न् आम्हा हार जीतची
दाखवू षक्ती या रक्ताची
एक मनाने ऐक्य राखुनी
लढू जाई तो प्राण...!! ।। 3।।










6 खेळू यारे, खेळ सारे

खेळू यारे, खेळ सारे।। धृ।।

रोजच आम्हा वाटे हवे
खेळ खेळण्या नवे नवे,
नव्या नव्या मौज मजेचे
रंग ढंगही वेगळे!........।। 1।।

नव्याच गोश्टी, नवेच गाणे
नाचू गाऊ, एक दिलाने,
नकलाच्या या सोंगामध्ये
हरवुनी जाऊ सगळे!....।। 2।।

क्रीडा आणि क्रीडांगण
जीवनही एक रणांगण,
जिंकू कधी हारू कधी
पचवू दोन्हीही स्वबळे!...।। 3।।              










7 काही चाहुळले पानी

घनगर्द हिरव्या रानी
काही चाहुळले पानी ।।धृ।।

वर रंगांचा फुलला
मनमोहक पिसारा
चेतावूनी भारावूनी
काया गेली हर्षूनी  ।। 1।।

मूक्त मोकळी हवा
ष्वास घेऊ भरूनी
फूलपानांच्या या गावी
खुषाल राहू येऊनी ।। 2।।

खळाळते स्वच्छ पाणी
वाहत जाते रानोरानी
पाखराच्या षिळांतली
ऐकू या चिमणगाणी ।। 3।।









8 सारेजण म्हणू सारेजण शिकू 

अ आ इ ई, क का कु कू
सारेजण म्हणू सारेजण शिकू ।। धृ।।

बे एक बे चे दहा फक्त पाढे
एकी बेकीचे शिकू सारे धडे
भेदाभेद सोडुनी सारे एक होऊ
अन्यायावििरुद्ध दंड सारे ठोकू ।। 1।।

ज्ञानविज्ञानाच्या शोधुनिया वाटा
अज्ञान, गरिबीला देउन टाकू फाटा
अंधश्रदधा, ढोंगीपणा काढुनिया टाकू
यंत्र-तंत्राचे मंत्र फक्त घोकू ।। 2।।

गोल गोल भूगोल अधांतरी फिरे
सूर्य चंद्राचे होती कसे फेरे?
प्रयोग करू... नकाषा भरू
मनातला भ्रम काढुनिया टाकू ।। 3।।









9 शिकू एबीसीडी अन् बाराखडी

शिकू एबीसीडी अन् बाराखडी
थोडी थोडी थोडी, थोडी थोडी थोडी ।। धृ।।

मातृभाषा पहिली
राष्ट्रभाषा दुहळु ही जगभाषा तिसरी
        सारी म्हणजे साडी,
        करी म्हणजे कडी।। 1।।
बी ओ ओ के
बूक म्हणजे पुस्तक,
एच ई ए डी
हेड म्हणजे मस्तक
        लर्न, लर्न्ट कधी तर
        लर्न, लर्न्डं कधी ! ।। 2।।
टिकटिक घडयाळ
टिकटिक बोले,
टेक टूक टेकन
क्रियापद चाले
        मेक मेड मेड तर
कट कट कधी  ।। 3।।
      
           -प्र. श्री. जाधव, मुखेड  



10 बस आली बस आली

बस आली, बस आली,
हात दाखवा हात,
रोडवर नका जाऊ
होईल तुमचा़़़ घात!
लोटा लोटी नका करू
रांग लावा नीट,
पाठोपाठ उभे रहा
माणुसकीची रीत!
गाडी सुटली गाडी सुटली
टण.. टण.. टण..!
तिकिटाचे पैसै काढा
छण..छण..छण..!                                 
सामान सारे वर ठेवा
उभे रहा नीट,
बसायला मिळेल 

प्रत्येकाला  शीट?
झाडे- झुडे मागे जाती
भर..भर..भर..!    
खिडकीवाटे नका काढू
हात नि कोपर..!                                 
गावे येती गावे जाती
टिण.. टिण.. टण..!
तुम्ही कुठे उतरणार?
ठेवा थोड आठवण!


11 चला झाडून काढू फरफर

घरात कचरा झालाय फार
चला झाडून काढू फरफर ।। धृ।।

अंगणात कचरा झालाय फार
चला झाडून काढू फरफर ।। 1।।

वर्गात कचरा झालाय फार
चला झाडून काढू फरफर ।। 2।।

मैदानात कचरा झालाय फार
चला झाडून काढू फरफर ।। 3।।

गावात कचरा झालाय फार
चला झाडून काढू फरफर ।। 4।।












12 निसर्गाचे गाणे गाऊ

पाने पाहू, फुले पाहू
निसर्गाचे गाणे गाऊ।। धृ।।

दोस्त आपली झाडेवेली
दोस्त आपली दरीडोंगरे,
दोस्ती करण्या त्यांच्यासवे
चला आपण धावत जाऊ..!।। 1।।

झुळुझुळु वाहे नदीचं पाणी
बोलावतेय गाऊन गाणी,
हुंदडायला नि डुंबायलाही
चला पळा रे धावत जाऊ..!।। 2।।

झाडे वेली किती सुंदर!
फुले फळे किती मधुर!!
चला पळा रे वेचू आणि
सारे मिळून वाटून खाऊ..!    ।। 3।।









13 चला चला पोहायला जाऊ सगळे

चमचमते तळे, ते पाणी निळे निळे!
चला चला पोहायला जाऊ सगळे।। धृ।।

मौज खरी तर पोहण्याची
घेेऊन तर पाहा एकदाची!
उडवू पाणी उडवू ठिक-या
खेळ खेळू या रे वेगळे ।। 1।।

पाहू माशान् पाहू बगळे

पोहत राहू सगळे सगळे
लपाछपीचा खेळ खेळुया
भान हरपुनी सगळे ।। 2।।

त-हाच न्यारी या षंखांची
सागरगोटे-शिंपल्यांची
वेचत राहू जमवत राहू
गारगोटी नि शंकोळे ।। 3।।









14 देशाहुनी देशात या रे

देशाहुनी देषात या रे नाही कोणी मोठा
भारताच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे मोठा!! ।।धृ।।

न्याय असे ना सैन्य असे, ना असे राष्ट्रपती

 देेेेेशाचे यारे सारे  शिपाई हाच अभिमानी ताठा !।।1।।

राजा असो, रंक असो वा असो कुणी साधा
नागरिक या देषाचा हाच मान आहे मोठा !।।2।।

अषोक चक्र, अषोक स्तंभ, भारताचे मानदंड
राष्ट्रगीत अन् राष्ट्रगान तर चैतन्यांचा साठा !।।3।।















15 चिमणबोली आमची बोली

चिमणबोली आमची बोली,
कळणार नाही कुणाला,
समजा-उमजा कुणी कितीही,
आकळणारही ना कुणाला! ।। 0।।
चटपट ‘च’ची आमची भाशा
ही कुणा ना उलगडायची
हातवारे नि कधी इषारे
कधी कधी तर बडबडायची
मान वळवूनी हात हालवूनी
दातही विचकू चिडवायला।। 1।।
चिग्यामिंग्या, लोंग्यासोंग्या
स्पर्धक अन् मित्रही आमचे
चढाओढीने अभ्यास करूनी
बक्षिस मिळवून दाखवायचे
आई बाबां नि दटावा कुणीही
तयार न हेका टाकायला ।। 2।।
अंगत-पंगत येते रंगत
गप्पा न्या-या न्या-याच
मिटक्या मारत गप्पा ठोकत
खाऊ चाखत माखत
निरनिराळै पदार्थ रोज हे
एकमेकांचे चाखायला ।। 3।।
खेळू सगळे हसत हसत
षिवनापानी, आटयापाटया
चुरषीच्या या खेळामध्ये
पिटवत राहू हया चपाटया 
येते तेंव्हाच खरी रंगत
जेंव्हा होतं  थकायला ।। 4।।

16 वडाची सावली

वडाच्या पारंब्या
भुईवर लोंबल्या
पारंब्याला घेऊ
भर भर झोंब्या

वडाची घोटरं
खातात कबुतरं
सावलीत बसून
करतात गुटर्र ऽ

वडाची पानं
हिरवीगार छान
पत्रावळ लावून
करू खानपानं

वडाची सावली
छान विस्तारली 
उन्हाच्या झळांत
सारीच विसावली!

                               





17 वेगळीच काहूर

पानांची सळसळ
पाण्याची खळखळ
हर्षून पक्षीही
गातात मंजूळ

वा-याची सूंऽ सूंऽ
चिर्टांची गूंऽ गूंऽ
फुलांवर भुंगेही
करतात भूंऽ भूं ऽऽ

थेंबांची सरसर
पानांची थरथर
गवतांचे तुरेही
उडतात भूरभूर

तनाची कूरकूर
मनाची हूरहूर
दिवसा-रातीही
वेगळीच काहूर!






18.  घंटा

आइस्क्रीमची घंटा घणघणली
सा-यांनी बाहेर धूम ठोकली!

देवळातली घंटा घुमघुमली
प्रार्थना करण्या हात जुडली!

शाळेची घंटा घणघणली
सारे मैदानावर गोळा झाली!

राष्ट्रगीताची धून वाजली
पावले तिथेच स्तब्ध झाली!















19. खेळू या, नाचू या

पाखरांनो या, फुलपाखरांनो या
खेळू या, नाचू या, मित्रांनो या ।।

पाहातरी कसे हे उन्हं पडले
हळदी सोन्यांचे लेप चढले
कोवळया उन्हात नाचू या
नाचता नाचता गाऊ या ।। 1।।

गवत-कुरणाची त-हा न्यारी
पहाटे दवाची पडे ही स्वारी!
गवतावर दौडत जाउ या
दवांत पावले ही भिजवू या ।। 2।।

कळया-फुले ही चमचमती
चांदण्या उतरल्या धरेवरती!!
रंगत संगत करण्या थेडी
लपू या, छपू या बागडू या!।। 3।।









20 भिजण्याची हौस

रिप रिप पाउस
टिप टिप पाउस
भिजण्याची पावसात
भागली हौस।। 0।।

कडाडले ढग
गडाडले नभ
घोंघावून वा-याने
घातला हैदोस।। 1ं।।

पावसाच्या धारा
वाजतो नगारा
खळाळून ओढयाने
घातला धुडगुस।। 2।।

सैरावैरा गुरे
तषीच पाखरे
सापडेना आसरा
झाले उदास ।। 3।।







21.डिचांडिची करू!

म्हशीचं वगारू
लागलं उंडारू
थूबै्रऽय थूबै्रऽय करूनी
चला त्याला धरू!

गायीचं वासरू
लागलं हंबरू
चला त्याच्यासवे
हमाऽ हमाऽ करू!

घोडयाचं शिंगरू
लागलं खिंकाळू
चला त्याला धरून
खेळू वारू वारू!

शेळीचं पाटरू
उडया मारी तुरूतुरू
डोकें-डोकीस टकरून
डिचांडिची करू!
                






22  चला मित्रांनो पारावरं

आज आहे अवस्येचा शनिवारं
चला चला मित्रांनो पारावरं. ।। धृ।।

शनिअमावस्येची आली पर्वणी
मारुतीला अभिषेक घाली कोणी
शनिवारचा कोणाचा उपवास
कोणाकोणाचा तर निराहार ।। 1।।

शनिअमावस्येचा शुभ वार
नवसाचा दाविती उपहार
प्रसाद-शिरणी वाटे कोणी
कोणी वाटती गूळ-खोबरं ।। 2।।

बलोपासक तो बजरंगबली
सा-या गावाचा तोच वाली
म्हणू चालिसा नि स्तोत्र
जाळू दिवादीप नि कापूर ।। 3।।









23 आला आला गणपती आला

ला लाऽ, लल्ल ला, लल्ल लल्ल, लल्लला लाऽऽ
आला आला ऽऽ गकलांचाकलेशश्तोवर

सर्व विद्यांचा विद्येष्वर तो
ज्ञानदानाचे वरदान घेऊन
गात-नाचत, आला आला ।। 1।।

उंदरावर आला स्वार होऊन
लाडू मोदक हाती घेऊन
रसरसनांचा हा रसास्वाद
मिळे आम्हास चाखायला ।। 2।।

वेद वेदांचाही हा वेदेष्वर
वदवी वदनी ऋचा-वेद
अज्ञान घालवण्या जनाचा
धावत येतो हाकेला ।। 3।।









24. आटयापाटया खेळू गोटया

आटयापाटया खेळू गोटया
दौडत राहू देत झपाटया।।

टपल्या टीचक्या मारत राहू
दावून वाकुल्या चिडवत राहू
राग कोणाचा नको मनी पण
करतच जाऊ कान गोष्टया ।। 1।।

आंडूपांडूऽ खेळू विटीदांडू
खेळता खेळता भांडू भांडू
कोलू कोलू काही बोलू
मोजत राहू दांडूविटया ।। 2।।

आबक दुबक मापू आपण
रिंगण रिंगण राखू अंगण!
राज्य राखू करूणी वणवण
याहून राम रे! कुठे बेटया?।।3।।









25. रंग खेळू या

रंग उधळू या रे
रंग खेळू या,
खेळता खेळता
रंगात आपण
दंग होऊ या।। धृ।।

अभ्यासाची रडगाणी
आता नको रे,
रंगपंचमी आज
रंग टाकू रे !
अंग भिजवू या रे
चिंब होऊ या ।। 1।।
   
सोडूनी सारे
वादविवाद,
रंगाची रंगावर
करू या मात
रंग लावू या रे
दंग होऊ या ।। 2।।

रंग नाही, संग नाही
होणार कसे?
सूर जीवनाचे ते
जुळणार कसे?
रंग बनवू या रे
रंग बनू या  ।। 3।।

26. चिवचिव गाणी

चिवचिव करू, चिवचिव गाऊ
चिवचिव गाणी, गातच राहू ।।धृ।।

इवले इवले आमचे पंख
इवले इवले आमचे जग!
विस्तारलेल्या नभात या
उत्तुंग भरा-या घेऊ ।। 1।।

फडफडफड पंख फडकऊ
सूर-भरा-या मारत जाऊ!

थकल्या जिवांचे मन रिझवू ।। 2।।

बोल जरी आमचे बोबडे
सा-यांना परी तेच आवडे!
चिमण्याषा या ओठांतून
अमृतगाणी गातच राहू ।। 3।।

सुखाच्या या षोधात सारे
घालत राहती येरझारे!
आमचे दुखही सुखच ते
गाण्यातुंनी या गात राहू ।। 4।।




27. झिम्मा खेळू झिम्मा

झिम्मा बाई झिम्माऽ
झिम्मा खेळू झिम्माऽऽ ।। धृ।।

मैत्रिणी आम्ही
जिवा भावाच्या
जिवापाड 
जपायच्या!
घे ग घे, काळजी घे
मी घेतो तुझी
तू घे माझी!
दे बाई दे, टाळी दे
घे बाई घे, टाळी घे
तुझ्यासाठी झिम्मा
माझ्यासाठी झिम्मा! ।। 1।।

झिम्मा आपल्या
दोघींचा दोघींचा
सुखासुखी
खेळायचा
खेळायचा
सुखात खेळू
दुखाला गिळू
दे दे झिम्मा
घे घे झिम्मा ।। 2।।


28. फुगडी बाई फुगडी

फुगडी बाई फुगडी फुगडी
अंगभर लुगडी लुगडी ।। धृ।।

लुगडीचे वांदे रडू रडू सांगे
षेजीबाइचे तिखट कांदे
सांगू नको मला ते
उणे-देणे
तुझेमाझे काय गं
देणे घेणे?
मी बाई आपली...
बाईबापडी !

कोवळी बाई माझी
मैना ग मैना
काय झाली तिची
दैना ग दैना!
ऐक बाई ऐक
त्याला काय दमडी?
मी तषी तूही
उगडी नागडी !





                             ‘चिमणगाणी’ हा प्र.श्री.जाधव यांचा गीतसंग्रह लहानमुले तर गुणगुणतातच पण मोठयांनाही ते ताल धरायला लावतात...सहजता, सलयता नि सुलभता हे या काव्याचे विशेष होत.
        घराचं अंगण ओलाडून शाळेच्या प्रांगाणत पाऊल ठेवलेली मुले घर, समाज, नि षाळा या त्रिकुटातून जीवनाचं मेतकूट बनवू पाहतात. सोबत असलेले संस्कार, गुरुजणांची शिकवण, सोबत्यांचा सहवास नि पालकांचा आग्रह यातून जीवनाची कालक्रमणा करीत असतात. मनातला प्रचंड उत्साह, जिद्द नि यशस्वी होण्यासाठीची तळमळ.... त्यासाठी करावी लागणारी परााकाष्ठ यातूनही ती विरंगुळा षोधीत असतात. मग अलगद ओठावर येतात ती गाणी..! काहीतरी सतत गुणगुणावेसे वाटत राहते...गाण्यासोबत बागडावे वाटते...मित्रासोबत मनसोक्त हुंदडावे वाटते...यातच त्यांना जवळची वाटतात ती गाणी...मनातला भाव, अंगातला जोश, सहका-यांची साथ आणि यासोबत अशी चिमुकल्या विश्वातील, त्याच्या कृती, उक्ती नि शक्तीला प्रेरणा देणारी.....
        त्यासाठीच गा... प्र.श्री.जाधव यांची ही ‘चिमणगाणी’.... नाचा, खेळा, गुंणगुणत राहा....!